Ad will apear here
Next
सिनेमाचे दिवस
चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊन सुद्धा तो लागल्यावर त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहित नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळीसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली. घरातून झालेला विरोध, आलेले बरे-वाईट अनुभव, मान-सन्मान या सगळ्यांचा सविस्तर व रोचक वृत्तांत म्हणजे त्यांनी लिहिलेले ‘सिनेमाचे दिवस’ प्रांजल आत्मकथन. 

चित्रपट काढण्याचे बीज बालवयात कसे रुजले, घरचे तापलेले वातावरण, डॉ. काशिनाथ घाणेकर, पंडित भीमसेन जोशी यांचा स्नेह, चित्रपटसृष्टीशी संबधित माणसांच्या भेटी अशी पार्श्वभूमी सांगून पहिला चित्रपट ‘कशासाठी प्रेमासाठी’चे चित्रीकरण, त्यानंतरचे चित्रपट, प्रेक्षकांचे प्रेम, आर्थिक लाभ, तर कधी आलेले अपयश याचा मागोवा लेखकाने यात घेतला आहे. सामान्य मराठी कुटुंबातील व्यक्तीने या मायावी चित्रनगरीत कसे यश मिळविले, हे यातून समजते.
     
पुस्तक : सिनेमाचे दिवस
लेखक : अरुण गोडबोले
प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : २९३
किंमत : ३६० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZYZCA
Similar Posts
सिनेमाचे दिवस स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या आणि सिनेमा, नाटक वर्ज्य असलेल्या घरात जन्मलेला, वाढलेला मुलगा मोठा झाल्यावर चित्रपट निर्माता म्हणून लौकिक प्राप्त करतो, तेही वयाच्या चाळीशीनंतर. या चित्रपट निर्मात्याच्या, अरुण गोडबोले यांच्या धाडसाची ही कहाणी आहे. कशासाठी, प्रेमासाठी, नशीबवान, बंडलबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे
सिनेमाचे दिवस स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या आणि सिनेमा, नाटक वर्ज्य असलेल्या घरात जन्मलेला, वाढलेला मुलगा मोठा झाल्यावर चित्रपट निर्माता म्हणून लौकिक प्राप्त करतो, तेही वयाच्या चाळीशीनंतर. या चित्रपटनिर्मात्याच्या, अरूण गोडबोले यांच्या धाडसाची ही कहाणी आहे. कशासाठी?प्रेमासाठी?, नशीबवान, बंडलबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे
सिनेमाचे दिवस चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊनसुद्धा त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहीत नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळिसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली
श्री मनाचे श्लोक एक मागोवा ‘आधी प्रपंच करा नेटका’ असे रामदास यांनी सांगितले आहे. समर्थ रामदास म्हणजे केवळ पारमार्थिक संत नव्हेत, तर समाज शिक्षक, कवी, उपदेशक, रामोपासक, कुशल संघटक आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ संत, असे त्यांचे व्यामिश्र व्यक्तिमत्त्व होते. माणसाचे आयुष्य सफल व्हावयाचे असेल, तर त्याचे मन ताब्यात हवे, म्हणूनच समर्थांनी मनाला उपदेश करणारे श्लोक लिहिले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language